पालघर- संरक्षित आणि अतिदुर्मिळ असलेल्या खवल्या मांजराची खवले विकण्यासाठी भाईंदर येथे आलेल्या तिघांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. सतीश बिहरे (५१), सचिन ढोले (३८) व नीलेश उधे (३८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. साडेपाच किलो वजनाच्या या खवलांची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे २२ लाख रुपये इतकी किंमत आहे.
भाईंदर येथे खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक - आशिया
अतिदुर्मिळ असलेल्या खवल्या मांजराची खवले विकण्यासाठी भाईंदर येथे आलेल्या तिघांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. सतीश बिहरे, सचिन ढोले व नीलेश उधे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. साडेपाच किलो वजनाच्या या खवलांची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे २२ लाख रुपये इतकी किंमत आहे.
भाईंदर येथील महापालिकेच्या मीनाताई ठाकरे मंडईजवळ खवल्या मांजराची खवले विकण्यासाठी रत्नागिरीहून काही तस्कर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नवघर पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एका गाडीने तिघे जण आले असता मिळालेल्या माहितीनुसार त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून साडेपाच किलो खवले सापडली असून त्याची बाजारातील किंमत बाजारात सुमारे २२ लाख इतकी आहे. याप्रकरणी सतीश बिहरे (५१), सचिन ढोले (३८) व नीलेश उधे (३८) या तिघांना वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून हे तिघेही रत्नागिरीचे राहणारे आहेत.
खवले मांजर मुख्यतः आशिया व आफ्रिका खंडातील उष्णकटिबंधीय क्षेत्रात आढळून येतात. तसेच या मांजरांच्या खवल्यांचा वापर औषधे बनविण्यासाठी आणि जादूटोणा करण्यासाठी केला जातो. आरोपींनी खवले कुठून आणली आणि कोणास विक्रीसाठी आणली याबाबत अधिक तपास नवघर पोलीस करत आहेत.