महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 12, 2020, 10:09 AM IST

ETV Bharat / state

बस चालक-वाहकाचा प्रामाणिकपणा; ६० हजार रुपये असलेली पर्स प्रवाशाला केली परत..

बस स्वारगेट डेपोत पोहोचल्यानंतर चालक शेख आणि वाहक राजे यांनी एसटीचा दरवाजा बंद करुन विश्रामगृहात विश्रामासाठी निघून गेले. दोघेही विश्राम करत असताना एक प्रवासी तरुणी त्यांच्याकडे रडत- रडत आली. त्यांनी तिची विचारपूस केली असता, माझी पैसे असलेली पर्स हरवली असल्याचे या तरुणीने दोघांना सांगितले. त्यानंतर चालक व वाहक या दोघांनी बसची तपासणी केली असता, तरुणी बसलेल्या सीटखाली ही पैशाने भरलेली पर्स आढळून आली.

बस चालक-वाहकाचा प्रामाणिकपणा; ६० हजार रुपये असलेली पर्स प्रवाशाला केली परत..
बस चालक-वाहकाचा प्रामाणिकपणा; ६० हजार रुपये असलेली पर्स प्रवाशाला केली परत..

पालघर- स्वारगेट शिवशाही एसटी बसचे चालक बाबासाहेब शेख आणि वाहक तनवीर राजे यांनी प्रामाणिकता दाखवत प्रवाशाची पैशांनी भरलेली पर्स परत केली आहे. त्यांच्या या कामामुळे पालघर एसटी विभागाकडून या दोघांचा सत्कार देखील करण्यात आला आहे.

तरुणी बसमध्ये विसरली 60 हजार रुपये असलेली पर्स:-

पालघर एसटी डेपोमधून बुधवारी ११ वाजता स्वारगेटकडे हे दोघे शिवशाही बस घेऊन जात होते. ठाणे येथून काही प्रवासी चढल्यानंतर बसने पुढे मार्गक्रमण केले. या बसमधून ठाण्याहून एक तरुणी पिंपरी येथे जाण्यासाठी निघाली होती. ही तरुणी पिंपरी येथे बसमधून उतरली, मात्र आपली 60 हजार रुपये रोख रक्कम असलेली पर्स बसमध्येच विसरली.

बस चालक-वाहकाचा प्रामाणिकपणा; ६० हजार रुपये असलेली पर्स प्रवाशाला केली परत..

चालक आणि वाहकाचा प्रामाणिकपणा:-

बस स्वारगेट डेपोत पोहोचल्यानंतर चालक शेख आणि वाहक राजे यांनी एसटीचा दरवाजा बंद करुन विश्रामगृहात विश्रामासाठी निघून गेले. दोघेही विश्राम करत असताना एक प्रवासी तरुणी त्यांच्याकडे रडत- रडत आली. त्यांनी तिची विचारपूस केली असता, माझी पैसे असलेली पर्स हरवली असल्याचे या तरुणीने दोघांना सांगितले. त्यानंतर चालक व वाहक या दोघांनी बसची तपासणी केली असता, तरुणी बसलेल्या सीटखाली ही पैशाने भरलेली पर्स आढळून आली. आपली कर्तव्यदक्षता आणि प्रामाणिकपणा दाखवत या दोघांनीही ती पैशाने भरलेली पर्स तरुणीकडे सुपूर्द केली. आपली पर्स बघताक्षणी गोंधळलेल्या तरुणीच्या जीवात जीव आला व ती पर्स हातात घेऊन आनंदाने रडू लागली.

बस चालक व वाहकाचा सत्कार:-

पैशाने भरलेली पर्स परत केल्याने तरुणीने बस चालक बाबासाहेब शेख आणि वाहक तनवीर राजे यांचे आभार मानले. त्यानंतर घडलेल्या घटनेबाबत या दोघांनी ही पालघर डेपोमध्ये माहिती दिली. डेपोच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या दोघांचे अभिनंदन केले. कर्तव्य दक्षता आणि प्रामाणिकपणा दाखवून प्रवाशाची पर्स परत केल्यामुळे पालघर एसटी विभागाचे व्यवस्थापकीय प्रमुख राजेंद्र जगताप यांनी दोघांचाही सत्कार केला असून या चालक व वाहकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details