पालघर - भारतीय डाक विभाग व युनिसेफ इंडिया यांच्यातर्फे बालदिनानिमित्त स्टॅम्प डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पालघर तालुक्यातील माकुणसार येथील निधी राहुल म्हात्रे या विद्यार्थिनीने उत्कृष्ट असे स्टॅम्प डिझाईन बनवत, देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
स्टॅम्प डिझाईन स्पर्धेत पालघरची निधी म्हात्रे देशात प्रथम - भारतीय डाक विभाग व युनिसेफ इंडिया स्टॅम्प डिझाईन स्पर्धा
या स्टॅम्प डिझाईन स्पर्धेत देशभरातील 14 हजार 578 लोकांनी सहभाग घेतला होता, मात्र या सर्वांपेक्षा निधीचे स्टॅम्प डिझाईन अव्वल ठरले.

स्टॅम्प डिझाईन स्पर्धेत पालघरची निधी म्हात्रे देशात प्रथम
हेही वाचा -टोकियो ऑलिम्पिक-२०२० साठी स्टेडियमचे बांधकाम पूर्ण
या स्टॅम्प डिझाईन स्पर्धेत देशभरातील 14 हजार 578 लोकांनी सहभाग घेतला होता, मात्र या सर्वांपेक्षा निधीचे स्टॅम्प डिझाईन अव्वल ठरले. निधी ही पालघर तालुक्यातील माकुणसार येथील मूळ रहिवासी असून बोईसर येथील ऐईसीएस-1 शाळेत इयत्ता दहावीत शिकत आहे. निधीच्या यशामुळे सर्वत्र तिचे कौतुक होत असून 20 नोव्हेंबरला तिला दिल्ली येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.