महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेना प्रवेशानंतर प्रदीप शर्मा यांचे विरारमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन - palghar virar news

चकमकफेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी शिवसेना प्रवेशानंतर वसई विरार क्षेत्रात रविवारी शिवसेनेच्या झेंड्याखाली जाहीर एन्ट्री केली.

प्रदीप शर्मा यांचे विरारमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन

By

Published : Sep 15, 2019, 9:05 PM IST

पालघर/वसई - नालासोपारा विधानसभा क्षेत्राचे संभाव्य उमेदवार आणि चकमकफेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी रविवारी वसई विरार क्षेत्रात जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

शिवसेना प्रवेशानंतर प्रदीप शर्मा यांचे विरारमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार फाट्यापासून त्यांच्या शक्तीप्रदर्शनाला सुरुवात झाली. यावेळी शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पहिली भेट त्यांनी चंदनसार येथील आगरी सेनेच्या कार्यालयाला दिली.

हेही वाचा... पालघरमध्ये मुसळधार पाऊस; आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या चाळीत शिरले पाणी

शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी वसई विरार शहरात स्टेशन परिसर, रहदारीच्या अनेक ठिकाणी 'चोर की पोलीस?' असे बॅनर लावण्यात आले होते. याबाबत प्रदीप शर्मांना विचारले असता त्यांनी यावर अधिक भाष्य न करता 'मी पोलीस आहे', असे सांगितले.

हेही वाचा... पालघर नगरपरिषद शासकीय निधी अपहारप्रकरणी कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश

प्रदिप शर्मांच्या अशा शक्ती प्रदर्शनामुळे आणि राजकीय एन्ट्रीमुळे वसई विरार शहरातील महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची ताकद वाढली आहे. गेल्या २५ वर्षांपासून वसई विरार शहरावर एकहाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीचा गढ महायुतीचे सरकार जिंकू शकेल का? हे मात्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

हेही वाचा... विविध मागण्यांसाठी कष्टकरी संघटनेचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details