महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 20, 2019, 5:38 PM IST

Updated : Oct 20, 2019, 6:34 PM IST

ETV Bharat / state

पालघरमध्ये कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यांचे वाटप, निवडणूक पथके रवाना

पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 2 हजार 193 मतदान केंद्रे आहेत. यापैकी  ग्रामीण भागात 1 हजार 160 मतदान केंद्रे तर शहरी भागांत 1 हजार 33 मतदान केंद्रे आहेत.

पालघरमध्ये कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यांचे वाटप

पालघर- राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत असून पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या निवडणूकप्रक्रियेसासाठी सर्व तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. सकाळपासूनच निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदानासाठी आवश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे.

या साहित्यांचे वाटप -

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम), व्हीव्हीपॅट सोबतच मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी, मतांची हिशोब पत्रिका, अभिरूप मतदान प्रमाणपत्र, मतदान प्रक्रिया सुरू झाल्याची व बंद झाल्याची नोंदवही, प्रदत्त मतपत्रिका, मतदान केंद्र भेटपुस्तिका, चिन्हांकित मतदार यादी यासह इतर अनुषंगिक मतदान साहित्यांचे वितरण करण्यात आले आहे.

पालघरमध्ये मतदान साहित्यांचे कर्मचाऱ्यांना वाटप

चोख पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्य घेऊन मतदान पथके मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आली आहेत. पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 2 हजार 193 मतदान केंद्रे आहेत. यापैकी ग्रामीण भागात 1 हजार 160 मतदान केंद्रे तर शहरी भागांत 1 हजार 33 मतदान केंद्रे आहेत. या निवडणुकीत 196 मतदान केंद्रांमध्ये बदल झाले असून त्यापैकी नालासोपारा 149, वसई 27 तर बोईसरमधील 14 मतदारकेंद्रांचा समावेश आहे. मतदान प्रक्रियेसाठी केंद्रांवर 14 हजार 114 अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याखेरीज 3 हजार 960 पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व एसआरपीएफ अशा सहा कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Last Updated : Oct 20, 2019, 6:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details