महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नियमबाह्य लसीकरण करणारा तालुका आरोग्य अधिकारी सक्तीच्या रजेवर - palghar vaccination news

लसीकरण केंद्राची परवानगी नसताना तसेच पालघर शहरात लसीचा तुटवडा असताना असे अनधिकृत लसीकरण केंद्र कसे चालवले जाते, असा सवाल उपस्थित करत संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पालघर नगरपरिषदेच्या नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी केली.

By

Published : Aug 4, 2021, 4:17 PM IST

Updated : Aug 4, 2021, 4:46 PM IST

पालघर - तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात छुप्या पद्धतीने लसीकरण सुरू असल्याची बाब पालघर नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर याप्रकरणी प्रशासनाने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित खंदारे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.

अधिकृत केंद्राबाहेर सुरू होते लसीकरण

पालघर शहरात भगिनी समाज शाळेच्या आवारात अधिकृत लसीकरणाचे केंद्र असताना तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयात छुप्या पद्धतीने काही लोकांचे लसीकरण सुरू असल्याचे कळल्यानंतर पालघर नगर परिषदेच्या नगरसेवकांनी कार्यालयात धाड घातली व सर्वांची धावपळ उडाली. या केंद्रावर 46 जणांना दिवसभरात लस दिल्याच्या नोंदी असून ते कर्मचारी आरोग्य विभागाशी संबंधित असल्याचा पवित्रा आरोग्य विभागाने घेतला. लसीकरण केंद्राची परवानगी नसताना तसेच पालघर शहरात लसीचा तुटवडा असताना असे अनधिकृत लसीकरण केंद्र कसे चालवले जाते, असा सवाल उपस्थित करत संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पालघर नगरपरिषदेच्या नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी केली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

करण्यात आली होती कारवाईची मागणी

पालघरमध्ये लोकांना पहाटेपासून रांगा लावूनही लसी मिळत नसताना खासगी लोकांना कार्यालयात देण्यात आलेल्या लसीप्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खंदारे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या जागी मासवण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तन्वीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नगरसेवकांनी घातला होता घेराव

पालघर नगरपरिषद क्षेत्रातील लोकसंख्येच्या अवघे 16 टक्के लसीकरण पूर्ण झाले असून आठ लसीकरण केंद्रांपैकी 7 केंद्रे बंद पडल्याने सध्या लस मिळविण्यासाठी नागरिकांना मध्यरात्रीपासून रांगा लावाव्या लागत असल्याने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आदींसह नगरसेवकांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सोमवारी घेराव घातला होता. पालघर नागरपरिषदेला 1, 00, 150 इतका अत्यल्प लस साठा दिला जात असल्याने तो वाढवून मिळावा, अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

Last Updated : Aug 4, 2021, 4:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details