पालघर - जिल्ह्यात शालेय विद्यार्थी वर्गाला ऑनलाईन शिक्षणपद्धतीसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. या मागणीकरता श्रमजीवी संघटनेकडून वाडा पंचायत समितीसमोर आंदोलन करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या शाळामधे विद्यार्थीवर्गाला प्रत्यक्ष शिक्षण सुरू करण्यात यावे. शाळा सुरू करण्यात याव्यात. दुर्गम भागात विद्यार्थी वर्गाला ऑनलाईनसाठी लॅपटॉप, मोबाईल व त्याचे रिचार्ज करणे, नेटवर्क उपब्धतता करून द्यावा तरच ऑनलाइन शिक्षण सुरू करा, अशी मागणही त्यांच्याकडून करण्यात येतेय. पालघर जिल्ह्यातील वाडा पंचायत समिती कार्यालयात 9 ऑगस्टला शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचं शिक्षण विषयावर आंदोलन करण्यात आले.