महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2019 : क्रांतिकारी मार्क्सवादी पक्ष रिंगणात उतरणार

क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षानेही आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. हा पक्ष ठाणे आणि पालघर जिल्ह्यात निवडणूक लढविणार असल्याची माहिती, पक्षाचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष बळीराम चौधरी यांनी दिली.

By

Published : Sep 16, 2019, 8:31 AM IST

क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाचा रिंगणात उतरणार

पालघर - राज्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. यातच आता क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षानेही या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. हा पक्ष ठाणे आणि पालघर जिल्ह्यात निवडणूक लढविणार असल्याची माहिती, पक्षाचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष बळीराम चौधरी यांनी दिली. वज्रेश्वरी येथे 14 आणि 15 सप्टेंबर रोजी झालेल्या दोन दिवसीय कार्यकर्ता कार्यशाळेत घेण्यात आला. तसेच निवडणुकीत समविचारी पक्षाशी आमची युती राहील आणि तशी बोलणी चालू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा -लोकसभा लढवणार नाही, विधानसभा निवडणूक कराड दक्षिणेतूनच - पृथ्वीराज चव्हाण

या कार्यशाळेत बालयोगी सदानंद महाराज आश्रम बचाव आंदोलन कार्यक्रमात सहभागी असलेले कार्यकर्ते कॉ. विजय पाटील आणि त्यांची पत्नी सुनंदा पाटील या दाम्पत्यसह इतर कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तानसा अभरण्यातील स्थायी व समतोल विकासाबाबत चर्चा व याबाबत धोरणात्मक विषयावर चर्चा करण्यात आली. विक्रमगड तालुक्यात 'वारली बंड' या हुतात्मा दिनाचे आयोजनाबाबत कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष कॉ. रमेश ठाकुर, राज्य सेक्रेटरी राजेंद्र परांजपे, बळीराम चौधरी, सेक्रेटरी संज्योत राऊत आदीं उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details