पालघर - डहाणूतील हैतिक भरत शहा नामक तरुणाने सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची भीती दाखवत तरुणीचा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विरोधात तेवीस वर्षीय तरुणीने डहाणू पोलीस ठाण्यात नोंदविला आहे. गोवा येथे शैक्षणिक सहलीला गेल्यावर हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
सोशल मीडियावर फोटो टाकण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर बलात्कार;डहाणूतील घटना - rape in palghar
डहाणूतील हैतिक भरत शहा नामक तरुणाने सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची भीती दाखवत तरुणीचा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तरुणी वसई येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, गतवर्षी शैक्षणिक सहलीसाठी गोवा येथे गेली होती. यावेळी तिचे फोटो सोशाल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी आरोपीने दिली. यानंतर एका हॉटेलमध्ये नेऊन त्याने तरूणीवर बलात्कार केला.
14 फेब्रुवारी 2018 ते 8 ऑक्टोबर 2019 या काळात धमकावून गोवा आणि डहाणू येथे हे कृत्य केल्याची तक्रारीत नोंद आहे. तसेच आरोपीने गुजरात राज्याच्या बलसाड जिल्ह्यातील उंबरगाव येथील कार्यालयात जबरदस्तीने बोलावल्याचे तक्रारीत नोंदवण्यात आले आहे. संबंधित आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 417 आणि 509 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.