पालघर- शहर पोलिसांच्या वतीने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' उपक्रमाअंतर्गत पालघर येथे कोरोना विषयी जनजागृती करण्यात आली. पालघर शहरातील बाजारपेठ, गजबजलेले ठिकाण, महत्वाचे चौक, दाट लोकवस्ती असलेले चौक, बाजारपेेेठ, रेल्वे स्थानक या ठिकाणी नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग, मास्कचा वापर, हॅन्ड सॅनिटायझरचा वापर आदींतीबाबत जनजागृती करण्यात आली.
पालघरमध्ये पोलिसांनी केली 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेची जनजागृती - पालघर पोलिसांची जनजागृती
पालघर शहर पोलिसांनी स्वत: पुढाकार घेऊन माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची जनजागृती केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने या विशेष मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर पोलीस दलाकडूनही याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आपल्या सहकाऱ्यांसोबत कोरोना बाबत घ्यावयाची काळजी, नागरिकांनी कोरोना विषयीच्या नियम व अटींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. लोकांना मास्क, सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस गेले अनेक महिने अहोरात्र मेहनत घेत आहेत. कोरोनाच्या या कठीण काळात पोलिसांनी सुरुवातीपासूनच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचे प्राण पणाला लावून काम केले आहे. नागरिकांनीही कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी या जनजागृतीच्या माध्यमातून केली आहे.