महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजी विक्रीच्या आडून गुटखा विक्री पकडली, पालघर पोलिसांची कामगिरी - पालघर पोलिसांची कारवाई

आरोपींना पालघर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून टेम्पोसह एकूण 14 लाख रुपये 90 हजार 070 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पालघरने केली आहे.

पालघर
पालघर

By

Published : Oct 7, 2020, 3:18 PM IST

पालघर- भाजीची विक्री करत असल्याचे भासवून अ‌ॅपे टेम्पोमधून तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असल्याचा प्रकार पालघर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. यात आरोपींना पालघर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून टेम्पोसह एकूण 14 लाख रुपये 90 हजार 070 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पालघरने केली आहे.

जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर अवैधपणे तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत असते, अशी गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. गुजरात राज्यातून मुंबईच्या दिशेने एक पांढऱ्या रंगाचा टेम्पो वाहतूक करत आल्याची माहिती मिळताच मनोर येथे पालघर पोलिसांनी सापळा रचला. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अ‌ॅपे टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये भाजी भरलेली दिसली. या वाहनात आतील बाजूस गुटखा आढळून आला.

गुटख्यामध्ये विमल पान मसाला, शुद्ध प्लस, रजनीगंधा असा 8 लाख 5 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. यात मुंबईतील मरोळ भागातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या पथकाने केली. भाजीपाल्याच्या आडून गुटखा वाहतूक होत असल्याचा प्रकार यातून उघड झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details