महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाण्यावर तरंगू लागलेय भातपीक, जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान - Palghar Paddy Crop damaged

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात कालपासून विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. यात जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 'कोरोना काळात शेतीला मजूर मिळत नाही, म्हणून भात शेतीची बिकट परिस्थितीत लागवड केली. आज या शेतीचे नुकसान झाले आहे. पावसामुळे 100 टक्क्यांपेक्षाही जास्त नुकसान झाले आहे,' अशी उद्विग्न प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून मिळत आहे.

पाण्यावर तरंगू लागलेय भातपीक, जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान
पाण्यावर तरंगू लागलेय भातपीक, जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान

By

Published : Oct 15, 2020, 3:41 PM IST

Updated : Oct 16, 2020, 9:56 AM IST

पालघर - जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या वादळी पावसाने मोठ्या भातशेतीचे नुकसान केले आहे. यात शेतकऱ्यांनी कापणी केलेली भात पिके पावसामुळे साचलेल्या पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. हे नुकसान पाहून शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात कालपासून विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. यात जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 'कोरोना काळात शेतीला मजूर मिळत नाही, म्हणून भात शेतीची बिकट परिस्थितीत लागवड केली. आज या शेतीचे नुकसान झाले आहे. पावसामुळे 100 टक्क्यांपेक्षाही जास्त नुकसान झाले आहे,' अशी उद्विग्न प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून मिळत आहे.

पाण्यावर तरंगू लागलेय भातपीक, जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान

हेही वाचा -शेततळ्यातील पाणी तात्काळ कमी करा; सोलापूर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

वाडा तालुक्यातील चांबले येथील शेतकरी भालचंद्र कासार यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. त्यांनी तीन एकर जागेतील भातपिकाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. कापणी केलेले भात पीक पावसाच्या पाण्यावर तरंगू लागले आहे. भात पीक पाण्यात पडून राहिले तर भाताच्या दाण्याला कोंब फुटतात आणि दाणा खराब होतो. शिवाय, या भाताचा पेंढाही जनावरांना खाण्यालायक किंवा विकण्यालायक राहात नाही, असे त्यांनी सांगितले.

येथील शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज वाडा तालुका भाजपच्या वतीने वाडा तहसील कार्यालयात निवेदन देऊन हेक्टरी 45 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. जिल्ह्यातील विक्रमगड भागात पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करा, अशी मागणी पंचायत समितीच्या सभापती नम्रता गोवारी यांनी केली आहे.

हेही वाचा -सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे 385 गावातील पाच हजार हेक्टर क्षेत्रातील भात पीक बाधित

Last Updated : Oct 16, 2020, 9:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details