पालघर (वाडा) -आगामी विधानसभा निवडणुकीत वाडा तालुक्याकडे राजकीयदृष्ट्या विशेष लक्ष केंद्रीत होताना दिसत आहे. वाडा तालुका हा तीन विधानसभा मतदारसंघात विभागला असल्याने येथे राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विविध राजकीय पक्ष अनेक कार्यक्रम, परिसंवाद यांचे आयोजन करताना दिसत आहेत.
वाडा तालुक्यात विधानसभेची जोरदार तयारी, सर्व पक्षांकडून "मतदारसंघ आढावा" कार्यक्रमांची आखणी भाजपकडून पालघर जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा वाड्यातील पोशेरी येथे घेण्यात आला. त्यानंतर शिवसेनेकडून विक्रमगड येथे माऊली संवाद माध्यमातून समस्यांचे गाऱ्हाणे ऐकण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. तर सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही यावेळी आपल्या पक्षातील गळती रोखण्यासाठी बैठकाचे आयोजन करीत आहे.
वाडा तालुक्यात विविध राजकिय पक्षांचे प्रतिनिधीत्व
विक्रमगड विधानसभा भाजपच्या ताब्यात आहे तर भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आणि शहापूर विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडूरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने येथे राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे.
वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे राजकीय बलाबल पाहीले, तर शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे 4 सदस्य तर पंचायत समितीचे 5 सदस्य आहे. भाजपचे अनुक्रमे 2 जिल्हा परिषद तर, 5 पंचायत समिती सदस्य आहेत आणि राष्ट्रवादीचा 1 पंचायत समिती सदस्य आहे.
वाडा तालुक्यात विधानसभेची जोरदार तयारी, सर्व पक्षांकडून "मतदारसंघ आढावा" कार्यक्रमांची आखणी पालघर जिल्ह्यातील वाडा मतदारसंघ पुर्वी अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. तेव्हा या भागाचे प्रतिनिधीत्व आमदार विष्णू सावरा यांनी केले होते. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत वाडा विधानसभा मतदारसंघाचे तीन भागात विभाजन झाले. यातील बहुतांश महसुली भाग भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर आणि भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात जोडला गेला. तर उर्वरित कंचाड महसुली मंडळ हे विक्रमगड विधानसभा मतदारसंघाशी जोडला गेला आहे. विक्रमगड मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात येतो. माजी मंत्री व विद्यमान आमदार विष्णू सावरा हे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघानंतर आता विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.