पालघर - भाजीपाला, फळे आणि किराणा माल खरेदी करण्यासाठी ग्राहकांना सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. मात्र या वेळेत नागरिकांमार्फत खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. स्थानिक प्रशासनामार्फत गर्दी न होण्याबाबतचे वारंवार नियोजन केले जात असले तरी नागरिक नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच पालघर नगरपरिषद हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नगरपरिषद हद्दीतील बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश नगरपरिषदेने दिले आहेत.
पालघर नगरपरिषदेचा बाजार बंदीचा निर्णय; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला - Palghar Municipal Council
शासनाने भाजीपाला व इतर आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना पाच तासाची सवलत दिली असली तरी नागरिक अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडून गर्दी करत आहे. नागरिकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून एकाच वेळी आठवड्याभराची भाजी व किराणामाल खरेदी करावा, असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.
पालघर शहरात बाजार बंद
नगरपरिषद कार्यालयासमोरील रस्त्यावर भाजी, फळे व मासळी बाजार तसेच गर्दीत भरवला जाणारा बाजार बुधवारपासून (आज) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याने त्यांच्या कोरोना संसर्गाचा मोठा धोका उद्भवू शकतो. यासाठी नगरपरिषदेने ही कठोर पाऊले उचलली असल्याचे सांगितले आहे. नगर परिषदेकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाच्या जोरावर विक्रेत्यांनी गर्दी होऊ देऊ नये, असे आवाहन केले होते. मात्र त्यानंतरही गर्दी कायम होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नगरपरिषदेने बाजार बंदीचा निर्णय घेतला आहे. जे विक्रेते व नागरिक या निर्णयाला विरोध करतील अशांवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असेही नगरपरिषद प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहेत. शासनाने भाजीपाला व इतर आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना पाच तासाची सवलत दिली असली तरी नागरिक अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडून गर्दी करत आहे. नागरिकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून एकाच वेळी आठवड्याभराची भाजी व किराणामाल खरेदी करावा, असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.