महाराष्ट्र

maharashtra

पालघर साधुहत्या; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आरोपपत्र सादर करण्याचे दिले आदेश

By

Published : Aug 6, 2020, 1:26 PM IST

सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र सरकारला पालघर साधुंच्या झुंडबळीप्रकरणी पोलिस कर्मचार्‍यांविरोधात चौकशी आणि त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा तपशील सादर करण्यास सांगितले.

Supreme court
पालघर साधुहत्या

मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र सरकारला पालघर साधुंच्या झुंडबळीप्रकरणी पोलिस कर्मचार्‍यांविरोधात चौकशी आणि त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा तपशील सादर करण्यास सांगितले. तसेच या प्रकरणात दाखल करण्यात आलेले आरोपपत्र रेकॉर्डमध्ये घेण्यासही सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी होणार आहे.

काय आहे प्रकरण -

16 एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. तिहेरी हत्या प्रकरणात 165 आरोपींना अटक करण्यात आली असून यातील 11 जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनला. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी व 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 7 मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. पालघरचे पोलीस अधीक्षक म्हणून दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details