पालघर - समुद्राच्या किनाऱ्यावर गुरूवारी 5.83 मीटर उंच लाटा उसळल्या आणि सातपाटी येथे धूप प्रतिबंधक बंधारा पार करत समुद्राचे पाणी वस्तीत शिरले. यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसले तरी, गतवर्षी सातपाटी गावात समुद्राचे पाणी शिरून सुमारे 300 घरांचे नुकसान झाले होते. गुरूवारी समुद्राचे पाणी पुन्हा गावात शिरल्याने नागरिक धास्तावले आहेत.
समुद्रात उठल्या 5.83 मीटर उंच लाटा, धूप प्रतिबंधक बंधारा पार करत वस्तीत शिरले समुद्राचे पाणी
गुरूवारी समुद्रात 5.83 मीटर उंच लाटा उसळल्या आणि सातपाटी येथील धूप प्रतिबंधक बंधारा पार करत समुद्राचे पाणी वस्तीत शिरले. पाणी गावात शिरल्याने नागरिक धास्तावले आहेत.
पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर गुरूवारी 5.83 मीटर उंच लाटा उसळणार असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. किनाऱ्यावरील घरांना निर्माण झालेला धोका वारा-पावसामुळे तूर्तास टळला असे वाटत होते. मात्र, दुपारनंतर समुद्राने अचानक रौद्ररूप धारण केले व समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. सातपाटी येथे समुद्रात उसळलेल्या 5.83 मीटर उंच लाटांनी धूप बंधारा पार केला व पाणी किनाऱ्यावरील वस्तीत शिरले. सुदैवाने भरतीला सुरुवात झाल्यानंतर वारा-पावसाने उघडीप दिल्याने निर्माण झालेल्या लाटा प्रभावहीन ठरल्या. त्यामूळे किनारपट्टीवरील लोकांनी सध्यातरी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
5 ऑगस्ट पर्यंत पाच मीटर व त्यापेक्षाही उंच लाटा समुद्रात उसळणार असल्याने पालघर जिल्ह्यातील वसई ते बोर्डी दरम्यान किनारपट्टीवरील घरांना असणारा धोका कायम आहे.