पालघर -तौक्ते चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका जिल्ह्याला बसला आहे. या चक्रीवादळामुळे मच्छिमार, शेतकरी, बागायतदार यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील बहडोली येथील जांभूळ उत्पादक शेतकरी आणि धुकटन येथील पोल्ट्री व्यवसायिकांचे देखील नुकसान झाले आहे. आज पालकमंत्री दादा भुसे यांनी नुकसाग्रस्त भागांना भेट देऊन पाहाणी केली.
पालकमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहाणी चक्रीवादळामुळे जिल्ह्यात 3 जणांचा मृत्यू
चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात 3 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी झाले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचे येत्या दोन दिवसांत पंचनामे करून, अहवाल शासनाकडे सादर करण्यात येईल. असे अश्वासन दादा भुसे यांनी यावेळी दिले. तसेच "म्युकरमायकोसीस", लहान मुलांना होणारे आजार आणि कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याचा आरोग्य आराखडा तयार करण्याचे निर्देशही यावेळी भूसे यांनी आरोग्यमंत्र्यांना दिले आहेत.
हेही वाचा -धक्कादायक : अवघ्या १३ तासात आई, वडील आणि मुलाचा कोरोनाने मृत्यू