महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तारापूर औद्योगिक वसाहत दुर्घटना: पालकमंत्र्यांनी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर - पालघर पालकमंत्री दादाजी भुसे न्यूज

तारापूर औद्योगिक वसाहतीतील एम 2 या प्लॉटमधील कारखान्यात शनिवारी संध्याकाळी सातत्या सुमारास भीषण स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी)अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

पालकमंत्री दादाजी भुसे
पालकमंत्री दादाजी भुसे

By

Published : Jan 12, 2020, 12:10 PM IST

पालघर - तारापूर औद्योगिक वसाहतीतील तारा नायट्रेट (ए. एन. के फार्मा) कंपनीत स्फोट होऊन दुर्घटना झाली. यात सात कामगारांचा मृत्यू आणि सात कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी)अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे भुसे यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

हेही वाचा - तारापूर एमआयडीसी स्फोट: राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत
तारापूर औद्योगिक वसाहतीतील एम 2 या प्लॉटमधील कारखान्यात शनिवारी संध्याकाळी सातत्या सुमारास भीषण स्फोट झाला. यानंतर तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी जखमी आणि मृत कामगारांचा शोध घेण्याचे करत होते. मात्र, अपघाताची तीव्रता पाहता राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला पाचारण करण्यात आले. कंपनीच्या आवारामध्ये आत्तापर्यंत सात मृतदेह शोधण्यात आले असून आणखी एक मुलगी बेपत्ता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details