पालघर - स्थानिक स्वराज्य संस्था कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेबाबत उदासीन असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. ग्रामपंचायत आणि नगरपंचायत हद्दीवरच कचऱ्याचे ढिग साचल्याने स्वच्छता मोहिमेचे तीन तेरी वाजले आहेत. या कचऱ्यात ओला व सुक्या कचऱ्यासोबत इतर जैविक घाण टाकण्यात येते. यामुळे कचरा कुजल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
जिल्ह्यातील वाडा -भिवंडी महामार्गालगत असलेल्या वाडा ग्रामपंचायतीकडून टाकण्यात येत असलेल्या कचऱयाने मोकाट जनावरांसह भटक्या कुञ्यांचा वावर वाढला आहे. प्रवासी व पादचाऱयांना याचा उपद्रवाचा होत असून, मोकाट जनावरांनी रस्त्याच्या मध्येच तळ ठोकल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.