पालघर -वडराई मच्छिमार सोसायटीच्या विश्वसाई या नौकेला समुद्रात खोलवर मच्छिमारी करत असताना 15 किलो वजनाचे मोठे कासव जाळ्यात आढळले. ते बाहेर काढण्यासाठी मच्छिमारांना मोठ्या शिताफीने ते जाळे कापावे लागले. या जाळ्यातून कासवाची सुखरुपपणे सुटका करून त्याला समुद्रात सोडले. या नौकेला दोनदा कासव जाळ्यात आढळण्याची घटना घडली आहे.
विश्वसाई नौकेने कासवाला दिले जीवदान हेही वाचा -रायगड : अष्टविनायक क्षेत्र महड येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त गणेश भक्तांचा महापूर
अंदाजे 14 ते 15 किलो वजनाचे कासव
जिल्ह्यातील वडराई बंदरातील वडराई मच्छिमार सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन रमेश नारायण मेहेर यांच्या विश्वसाई IND-MH -2-MM-5253 या क्रमांकाची ही नौका मच्छिमारी करण्यासाठी खोल समुद्रात शनिवारी (ता. 30) पहाटेच्या सुमारास गेली होती. मच्छिमारी करत असताना दुपारी दोनच्या सुमारास नौकेच्या जाळ्यात भले मोठे कासव आढळले. हे कासव अंदाजे 14 ते 15 किलो वजनाचे असल्याची माहिती नौकेचे मालक रमेश मेहेर यांनी दिली. जाळ्यात अडकलेल्या या कासवाला जीवदान देण्यासाठी नौकेतील मच्छिमारांनी वेळीच तत्परता दाखवत त्याची जाळ्यातून मुक्तता करून त्याला समुद्रात सोडले.
नौकेने दुसऱ्यांदा केली कासवाची सुटका
महिन्याभरात या नौकेला दुसऱ्यांदा कासव जाळ्यात सापडल्याचे आढळले. याआधीचे कासव 12 किलो वजनाचे होते. त्यालाही नौकेतील मच्छिमारांनी जीवदान दिले होते.
समुद्रात मच्छीमारी करित असताना अशा प्रकारे अनेकदा समुद्री जिवांची सुटका करत असताना मच्छिमारांना आपले किंमती जाळे कापावे लागते. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसत असतो.
हेही वाचा -सरपणासाठी जंगलात गेलेल्या वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू