पालघर -जिल्हा प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा जनसुनावणी विरोधात मच्छीमार व स्थानिक भूमीपुत्र आक्रमक झाले आहेत. जनसुनावणी सुरू असलेल्या ठिकाणी स्थानिकांनी आंदोलन सुरू केले आहे.
पालघरमधील दांडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात जनसुनावणी घेण्यात येत असून जनसुनावणीच्या ठिकाणी स्थानिक मच्छीमार व भूमिपुत्रांकडून धरणे आंदोलन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही, तोपर्यंत ही जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.