पालघर- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर केला. यात पालघर जिल्ह्याचा निकाल ८३.०५ टक्के लागला आहे. यात ८६.८८ टक्के मुलींचा निकाल लागला असून मुलींनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे.
वसई तालुक्याचा सर्वाधिक म्हणजेच ८७.३२ टक्के निकाल लागला आहे. पालघर जिल्ह्यातून एकूण ४२ हजार ७८ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली होती. त्यांपैकी २२ हजार ९५७ मुले व १९ हजार ७८ मुली असे एकूण ४२ हजार ३५ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी बसले. यापैकी १८ हजार ३३७ मुले व १६ हजार ५५७ असे एकूण ३४ हजार ९१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच पुनर्परिक्षेला बसलेल्या १ हजार ८४० विद्यार्थ्यांपैकी ५७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.