महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Palghar Grampanchayat Election : पालघर जिल्ह्यातील 342 सरपंचपदासाठी 1349 तर 3490 सदस्यपदासाठी 7402 उमेदवार रिंगणात - 342 Sarpanch Posts For 1349 Candidates

पालघर जिल्ह्यातील 342 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ( 342 Gram Panchayats in Palghar District ) 342 सरपंचपदासाठी 1349 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात तर 3490 सदस्यासाठी 7402 उमेदवार रिंगणात आहेत. काही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच बिनविरोध झाले आहेत. ( 349 Candidates are in Fray for 342 Sarpanch Posts ) सर्वच ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीच्या लढती असून, सेना विरुद्धभाजपा शिंदे गट लढती होणार आहेत.

Palghar District Grampanchayat Election
ग्रामपंचायत निवडणुक

By

Published : Oct 4, 2022, 5:24 PM IST

पालघर : पालघर जिल्ह्यातील 342 ग्रामपंचायतीच्या ( 342 Gram Panchayats in Palghar District ) निवडणुकीसाठी 342 सरपंचपदासाठी 1349 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात तर 3490 सदस्यासाठी 7402 उमेदवार रिंगणात ( 349 Candidates are in Fray for 342 Sarpanch Posts ) आहेत. काही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच बिनविरोध झाले आहेत. सर्वच ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीच्या लढती असून, सेना विरुद्धभाजपा शिंदे गट लढती होणार आहेत.

अनेक ठिकाणी विविध पक्षांनी एकत्रित येऊन परिवर्तन पॅनेल तयार केले :सोळा तारखेला होणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अजूनपर्यंत प्रचार होताना कुठे दिसत नाही. उमेदवार वैयक्तिक भेटी घेऊन मतदारांपुढे जात असल्याचे चित्र सर्व ठिकाणी पाहावयास मिळत आहे. अनेक ठिकाणी विविध पक्षांनी एकत्रित येऊन परिवर्तन पॅनेल तयार केले आहेत. त्याद्वारे निवडणूक लढवली जात आहे. एडवण ग्रामपंचायतीमध्ये तरुणांनी गावाच्या विकासासाठी परिवर्तन पॅनेल तयार करून शिवसेनेला आव्हान दिले आहे. तर उमरोळी येथे बहुजन विकास आघाडी व शिवसेनेमध्ये थेट लढत असून दोन अपक्षसुद्धा सरपंचपदासाठी आपले नशीब आजमावत आहेत.

सफाळे ग्रामपंचायतीमध्ये बहुजन विकास आघाडी विरुद्ध शिवसेना :सफाळे ग्रामपंचायतीमध्ये बहुजन विकास आघाडी विरुद्ध शिवसेना अशा लढती होणार आहे. सफाळे ग्रामपंचायत मध्ये 17 सदस्य असून या निवडणुकीसाठी येथील शिवसेना भाजपा मनसे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वांनी एकत्रित येत परिवर्तन पॅनल तयार केले असून परिवर्तन विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी लढत होणार आहे सरपंचासह प्रत्येक प्रभागात आमने-सामने उमेदवार निवडणुका लढवीत आहे अतिशय प्रतिष्ठित असलेली ही ग्रामपंचायत आतापर्यंत बहुजन विकास आघाडीकडे होती या निवडणुकीत काय परिवर्तन घडून येते हे निवडणुकीनंतरच उघड होणार आहे

जिल्ह्यातील सरपंच पदासाठी रिंगणात असलेले उमेदवार : 1) डहाणू - तालुका 62 सरपंच पदासाठी 289 उमेदवार रिंगणात, 2) पालघर - 83 सरपंच पदासाठी 273 उमेदवार, 3) तलासरी - 11 सरपंच पदासाठी 35 उमेदवार, 3) वसई - 11 सरपंच पदासाठी. 31 उमेदवार, 4) वाडा - 70 सरपंच पदासाठी 229 उमेदवार, 4) विक्रमगड 36 सरपंच पदासाठी 200 उमेदवार, 5) जव्हार - 47 सरपंच पदासाठी 189 उमेदवार, 6) मोखाडा - 22 सरपंच पदासाठी 103 उमेदवार,


जिल्ह्यात सदस्य पदासाठी रिंगणात असलेले उमेदवार : 1)डहाणू तालुका 718 सदस्यासाठी 1646 उमेदवार, 2) पालघर 831 सदस्यासाठी 1840 उमेदवार, 3) तलासरी. 171 सदस्यासाठी 452 उमेदवार, 4) वसई- 119 सदस्यासाठी 269 उमेदवार, 5) वाडा - 612 सदस्यासाठी 1101 उमेदवार, 5) विक्रमगड. 382 सदस्यासाठी 818 उमेदवार, 6) जव्हार - 439 सदस्यासाठी 841 उमेदवार, 7) मोखाडा - 218 सदस्यासाठी 835 उमेदवारConclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details