महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर मतदारसंघ : निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, ७२ हजार नवमतदार बजावणार हक्क - administration

पालघर मतदारसंघात एकूण १८ लाख ८५ हजार २९७ मतदार असून यामध्ये पुरुष मतदार ९ लाख ८९ हजार, महिला मतदार ८ लाख ९६ हजार १८६ व तृतीयपंथी मतदार १११ आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत नारनवरे

By

Published : Apr 28, 2019, 5:01 PM IST

पालघर - पालघर लोकसभेच्या मतदारसंघासाठी उद्या २९ एप्रिलला सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

पालघर मतदारसंघात एकूण १८ लाख ८५ हजार २९७ मतदार असून यामध्ये पुरुष मतदार ९ लाख ८९ हजार, महिला मतदार ८ लाख ९६ हजार १८६ व तृतीयपंथी मतदार १११ आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत नारनवरे

पालघर लोकसभा मतदारसंघात मतदार नोंदणी मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला. १ जानेवारी २०१९ नंतर ७२ हजार ३१४ नवीन मतदारांची नोंद झाली आहे. या मतदारसंघात एकूण २१७७ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यापैकी ग्रामीण भागात १ हजार १९२ तर शहरी भागात ९८५ मतदान केंद्र आहेत.

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार संख्या
डहाणू- २ लाख ६९ हजार ९८८
विक्रमगड- २ लाख ६४ हजार १३२
पालघर- २ लाख ७१ हजार १६७
बोईसर- २ लाख ९७ हजार ९१५
नालासोपारा - ४ लाख ८७ हजार ५६
वसई- २ लाख ९४ हजार ५३५

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्र
डहाणू ३२७, विक्रमगड- ३४८, पालघर- ३२२, बोईसर- ३५३, नालासोपारा- ४८९, वसई- ३८८

पालघर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक याप्रमाणे एकूण ६ मतदान केंद्र ही सखी मतदान केंद्र असणार आहेत. या मतदान केंद्रांवर सर्व अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्तावरील कर्मचारी महिला असतील. १४ मतदान केंद्र हे संवेदनशील असून यापैकी ९ मतदान केंद्र नालासोपारा विधानसभा मतदारसंघात, ४ बोईसर आणि १ डहाणू मतदारसंघात आहे. या मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षक आणि स्वतंत्र व्हिडिओग्राफर नेमण्यात आले आहेत. तसेच तेथे केंद्रीय पोलीस दल ठेवण्यात येणार आहे.

मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी १२ हजार ७२ अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष कार्यरत राहणार आहेत. ३ हजार ८३ कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. पोलीस यंत्रणेचे २३० अधिकारी, ३ हजार ८८५ कर्मचारी आणि होमगार्ड तसेच सीआरपीएफ आणि एसआरपीएफच्या प्रत्येकी दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावे व आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी मतदारांना केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details