पालघर -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी दहावीचा निकाल घोषित केला. यामध्ये पालघर जिल्ह्याचा निकाल 71.75 टक्के लागला आहे. जिल्ह्याच्या यावर्षीही मुलीच अव्वल ठरल्या असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 75.08 टक्के तर मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 68.92 टक्के इतके आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 6 टक्क्यांनी अधिक आहे.
पालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल 71.75 टक्के, यंदाही मुलीच अव्वल - result
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी दहावीचा निकाल घोषित केला. यामध्ये पालघर जिल्ह्याचा निकाल 71.75 टक्के लागला आहे.
पालघर जिल्ह्यातून एकूण 58 हजार 493 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली होती व 57 हजार 922 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 41 हजार 559 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच पुनर्रपरिक्षेला बसलेल्या 2 हजार 62 विद्यार्थ्यांपैकी 745 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पालघर जिल्ह्यात वसई तालुक्याचा दहावीचा निकाल सर्वाधिक 79.77 टक्के इतका लागला आहे. तसेच पालघर 74.54 टक्के, डहाणू 63.63 टक्के, वाडा 61.39 टक्के, मोखाडा 59.19 टक्के, जव्हार 56.86 टक्के व विक्रमगड तालुक्यचा निकाल 47.60 टक्के इतका लागला आहे.