महाराष्ट्र

maharashtra

निसर्ग चक्रीवादळ; 21 हजार नागरिकांना वादळाचा 'तडाखा' बसण्याची शक्यता, जिल्हाधिकारी म्हणाले. . . . .

By

Published : Jun 3, 2020, 3:50 AM IST

कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वतर्वण्यात येत आहे. हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकल्यास जोरदार वाऱ्यांसह पावसाचाही तडाखा बसणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे.

Palghar
जिल्हाधिकारी कैलास शिंदे

पालघर- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वतर्वण्यात येत आहे. हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकल्यास जोरदार वाऱ्यांसह पावसाचाही तडाखा बसणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील तब्बल २१ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची गरज आहे.

किनारपट्टी परिसरात राहणाऱ्या २१ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची गरज असल्याची माहिती जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी दिली आहे. या नागरिकांना सुरक्षितस्थळी असलेल्या निवारागृहात सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात येईल. त्यांना मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही शिंदे यांनी यावेळी दिली.

प्रशासनाने नागरिकांना हलवले सुरक्षितस्थळी

निसर्ग वादळामुळे किनारपट्टी भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. वाऱ्याचा वेगही प्रचंड प्रमाणत आहे. त्यामुळे निसर्ग वादळाचा तडाखा नागरिकांना बसू नये, म्हणून प्रशासन जोरदार तयारी करत आहे. डहाणू-आगर येथील 70 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details