पालघर - कोरोना विषाणुचा होणारा संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून ३१ मार्चपर्यंत जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व इतर अधिकारी कर्मचारी कार्यालयांमध्ये नागरिकांनी समक्ष भेटण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. तसेच नागरिकांनी ई-मेल व पोस्टाने सर्व कार्यालयात निवेदन, हरकती, तक्रार अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले.
'तक्रारी, हरकती थेट ई-मेलने पाठवा'..जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - palghar corona news
३१ मार्चपर्यंत जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व इतर अधिकारी कर्मचारी कार्यालयांमध्ये नागरिकांनी समक्ष भेटण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
प्रशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांनी समक्ष भेटण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
नागरिकांनी ईमेल व पोस्टाने पाठविलेली निवेदने, तक्रारी पूर्णतः विचारात घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बॅनर लावण्यात आले आहेत.