पालघर - एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. थकित वेतन लवकरात लवकर मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्यावतीने आज राज्यभर आंदोलन केले जात आहे. पालघर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात बाहेर कर्मचाऱ्यांनी आंदोलन कले. सोशल डिस्टन्स व कोरोना विषयीच्या अटी व शर्तींचे पालन करत हे आंदोलन करण्यात आले.
थकीत वेतनासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन - पालघर एसटी कर्मचारी न्यूज
कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीचे आणि माल वाहतुकीचे काम एस टी कर्मचाऱ्यांनी केले. मात्र, शासनाने त्यांना अद्यापही वेतन दिलेले नाही.
आंदोलन
एसटी महामंडळाच्या कामगारांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांचे वेतन तीन महिन्यांचा कालावधी संपूनही अद्याप मिळालेले नाही. कोरोनाच्या काळात कामगारांनी वेतन मिळत नसतानाही आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले आहे. अशा परिस्थितीत कामगारांना कामाचा मोबदला म्हणून वेतन देणे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. परिणामी, प्रशासनाने कामगारांना तत्काळ थकीत वेतन देऊन त्यांच्यावरील आर्थिक संकट दूर करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आत्मक्लेश आंदोलन केले.