महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमध्ये पुरस्थितीने भातशेतीचे नुकसान, शेती हंगाम रखडला - paddy cultivation

पालघरमध्ये अतिपावसामुळे भातशेतीची कामे रखडली आहेत.

पुरस्थितीने भातशेतीचे नुकसान

By

Published : Jul 27, 2019, 9:08 PM IST

पालघर (वाडा) -सततच्या पावसामुळे वाडा तालुक्यातील लागवडीचा हंगाम लांबणीवर गेला आहे. तर काहींच्या शेतात पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या भातशेती आणि शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील धरण साठा आणि वाडा तालुक्यातील वैतरणा, पिंजाळ आणि तानसा नदीच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे.

पालघरमध्ये पुरस्थितीने भातशेतीचे नुकसान

जिल्ह्यात खरीप हंगामातील लागवडी चालू असताना मुसळधार पावसाने सुरुवात केली. सर्वत्र शेतात पुराचे पाणी आल्याने शेतकरी वर्गाने हाती घेतलेला लागवडी थांबल्या आहेत. या अगोदर पावसाअभावी कामे रखडली होती आणि आता अतिपावसाने भातशेतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे भातशेतीची कामे लांबणीवर पडण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे येथे अतिपावसाने शेती पाण्याखाली गेल्याने भातशेतीची नुकसानही होत आहे, अशी माहिती स्थानिक शेतकरी महेश जाधव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

पावसामुळे धरणे भरली

मुसळधार पाऊसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही धरणे ओसंडून वाहत आहेत. पालघर जिल्ह्यातील धरणांची व नद्यांची जलपातळी आकडेवारी पाहिली धामणी धरणाचा उपयुक्त जलसाठा २७६.३५० द.ल.घ.मी. आहे. मात्र, २७ जुलैला ते धरण २२४.०७५ द.श.ल.मी. भरले. त्याचे ३ दरवाजे उघडून विसर्ग सुरू आहे. कवडसा उनैयी बंधारा उपयुक्त जलसाठा पातळी ९.९६० द.ल.घ.मी. असुन ते १००% भरले आहे. वांद्री मध्यम प्रकल्प आणि ठाणे जिल्ह्यातील तानसा धरण १००% भरले आहे. याभागातील वाडा तालुक्यातील वैतरणा १०१.३९ मीटर असून इशारा जलपातळी १०१.९० मी. तर धोका पातळी १०२.१० मीटर आहे. तसेच पिंजाळ नदी जलपातळी १०२.२२ मीटर असून इशारा पातळी १०२.७५ मीटर तर धोका पातळी १०२.९५ मीटर आहे. अशा प्रकारे नद्यांची जलपातळी वाढ होताना दिसत आहे.

जिल्ह्यातील पावसाची नोंद

जिल्ह्यात सरासरीने २७ जुलै रोजी सर्वाधिक पावसाची नोंद वाडा तालुक्याची ९०.०० मिमी, डहाणू- ९.०० मिमी, जव्हार- ५७.२५ मिमी, पालघर - १३.४२ मिमी, मोखाडा- ६९.१३ मिमी आणि विक्रमगड- ३७.८८ मिमी, तलासरी- ८.१३ मिमी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details