महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 25, 2021, 6:41 PM IST

ETV Bharat / state

पालघरमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती; जव्हार व डहाणू ग्रामीण रुग्णालयात उभारणार कोविड रुग्णालय

पालघर जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. अशातच ऑक्सीजनचा पुरवठा कमी पडत आहे. दरम्यान पालघर जिल्हा पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्याचा पाहणी दौरा केला. तसेच कोविड सेंटरला भेटी दिल्या. मात्र पालघर जिल्ह्यात ऑक्सिजन बेड व्यवस्था, तज्ञ वैद्यकीय अधिकारी, कोविड सेंटर उभारावे, अशा मागण्या लोकप्रतिनिधी आणि जनसामान्य रुग्णांकडून होत आहे.

हवेतून ऑक्सिजन निर्मिती
हवेतून ऑक्सिजन निर्मिती

पालघर -जिल्हा विकास निधीतून पालघर जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसल यांनी दिली. पालघर जिल्ह्यात प्रतिदिन सव्वा टन हवेतून 125 जंबो ऑक्सीजन सिलेंडर निर्मिती होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

पालघर जिल्हा आणि वसई-विरार महानगरपालिका मिळून आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 78 हजार 336 इतकी आहे. यात उपचार घेत असलेले रुग्ण 17 हजार 600 तर बरे झालेले रुग्ण 59 हजार 260 इतकी आहे. तसेच मृत्यू संख्या 1 हजार 476 इतकी आहे. पालघर तालुक्यात दिवसभरात 349, डहाणूत 165, तलासरी 69 आणि वसई विरार महागरपलिका 865 अशी रुग्ण संख्या आहे.

कोविड सेंटरची मागणी -

पालघर जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. अशातच ऑक्सीजनचा पुरवठा कमी पडत आहे. दरम्यान पालघर जिल्हा पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्याचा पाहणी दौरा केला. तसेच कोविड सेंटरला भेटी दिल्या. मात्र पालघर जिल्ह्यात ऑक्सिजन बेड व्यवस्था, तज्ञ वैद्यकीय अधिकारी, कोविड सेंटर उभारावे, अशा मागण्या लोकप्रतिनिधी आणि जनसामान्य रुग्णांकडून होत आहे. तसेच भविष्यात कोरोना रुग्णांना लागणारा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी हवेतून ऑक्सीजन निर्मितीसाठी जव्हार, पालघर व डहाणू येथे ऑक्सिजनची लवकरच निर्मिती होणार, असे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.

कोविड रुग्णालयाला मंजुरी -


पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार ३ कोटी २० लाखाच्या प्रशासकीय मंजूऱ्या जिल्हा विकास योजनेतून देण्यात आल्या आहे. त्यापैकी पालघर व जव्हार चे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. तसेच ऊर्वरित प्रकल्प लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details