वसई (पालघर) -जी. जी. कॉलेजमधील कोविड रुग्णालयात बसवण्यात आलेल्या ऑक्सिजनच्या मिनी प्लांटमध्ये रविवारी (आज) सकाळच्या सुमारास अचानक गळती सुरू झाल्याने महसूल प्रशासनाची धावपळ उडाली. मात्र वेळीच खबरदारी घेतली गेल्याने मोठा अनर्थ टळला.
वसईतील जी. जी. कॉलेजमधील ऑक्सिजन प्लांटमध्ये गळती; खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टळला
मागील चार-पाच महिन्यांपासून हे कोविड रुग्णालय बंद आहे. मात्र ऑक्सिजनसाठी मिनी प्लांट जैसें थे स्थितीत होता. रविवारी सकाळी या दोन्ही मिनी प्लांटमधून अचानक गळती झाली. या प्लांटमधून गळती होत असल्याची माहिती मिळताच महसूल प्रशासनाची धावपळ उडाली.
ग्रामीण भागातील कोविड रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावेत. या उद्देशाने मागील वर्षी पालघर जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार, वसईतील जी. जी. कॉलेजमध्ये कोविड रुग्णालय व ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली होती. मागील चार-पाच महिन्यांपासून हे कोविड रुग्णालय बंद आहे. मात्र ऑक्सिजनसाठी मिनी प्लांट जैसें थे स्थितीत होता. रविवारी सकाळी या दोन्ही मिनी प्लांटमधून अचानक गळती झाली. या प्लांटमधून गळती होत असल्याची माहिती मिळताच महसूल प्रशासनाची धावपळ उडाली. वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांनी तांत्रिकदृष्ट्या देखभाल दुरुस्ती करणार्या इलेक्ट्रिशीयनना घेऊन तत्काळ घटनास्थळ गाठले व या प्लांटमधील गळती थांबवली.
हेही वाचा -Pune Corona Update : चिंताजनक! पुण्यात आज 5 हजार 375 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद