महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेच्या विभागप्रमुखावर परप्रांतीयाचा प्राणघातक हल्ला - नालासोपारा क्राईम बातम्या

व्हिडिओ करत असल्याचे लक्षात येताच, यादव आणि आणखीन दोघांनी, लोखंडी रॉडने हजारेंवर जीवघेणा प्रहार केला. यात हजारे यांना डोक्याला आणि हाताला गंभीर जखम झाली आहे.

प्राणघातक हल्ला
प्राणघातक हल्ला

By

Published : Aug 12, 2020, 10:10 PM IST

पालघर/नालासोपारा - शिवसेनेच्या विभागप्रमुखावर परप्रांतीयाने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात घडला आहे. सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्याचा व्हिडीओ काढल्याच्या रागातून एका परप्रांतीयाने शिवसेनेच्या विभागप्रमुखावर जीवघेणा हल्ला केला.

आज दुपारी साडे बाराच्या दरम्यान ही घटना घडली आहे. नालासोपारा पूर्वेकडील संयुक्तनगर येथील विभागप्रमुख जितेंद्र हजारे हे आपल्या कार्यालयातून घराकडे जात असताना, कार्यालयाच्या बाजूचा लोखंडी स्टील विकणारा यादव नावाचा व्यक्ती सार्वजनिक स्थळी लघुशंका करत असल्याचे हजारे यांच्या निदर्शनास आले.

त्यावेळी त्यांनी आपल्या मोबाईलमधून त्याचा व्हिडीओ केला. व्हिडिओ करत असल्याचे लक्षात येताच, यादव आणि आणखीन दोघांनी, लोखंडी रॉडने हजारेंवर जीवघेणा प्रहार केला. यात हजारे यांना डोक्याला आणि हाताला गंभीर जखम झाली आहे. आताची बोटेही फ्रॅक्चर झाली आहेत. सध्या तुलिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details