पालघर - आता ‘मातोश्री’ वरुन आदेश निघत नाहीत, तर दिल्लीतील मातोश्रींचे आदेश ऐकावे लागतात. शिवसेना दिवसा शेर, तर रात्री ढेर असते, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जोरावर मुख्यमंत्री बनविण्याचे वचन तुम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते का? बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेस, राष्ट्रवादीविरोधात रान उठवले, त्या बाळासाहेबांना आज काय वाटत असेल, असा सवाल त्यांनी केला. राज्यात 6 जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत असून बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी पालघर येथून प्रचाराला प्रारंभ केला. डहाणू तालुक्यातील कासा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, ज्या मित्राला सोबत घेऊन प्रचार करुन, आपल्यासोबत निवडून आणले, त्याने जनादेश मिळूनही दुसऱ्यासोबत घरोबा केला. त्यामुळे आपल्याला विरोधी पक्ष म्हणून काम करावे लागतेय. भारतीय जनता पक्षाने जेवढ्या जागा लढवल्या, त्यापैकी 70 टक्के जागांवर विजय झाला. भारतीय जनता पार्टी असा विद्यार्थी आहे, ज्याला 70 टक्के मार्क आहेत, तो मेरीटमध्ये आला, वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला, पण त्याला बाहेर बसवले गेले. मात्र, वर्गामध्ये 40 टक्के मिळवणारे तीन विद्यार्थी एकत्र येऊन सत्तेत आले असल्याचा टोला देखील त्यांनी यावेळी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीला लगावला.
'आता ‘मातोश्री’ वरुन आदेश येत नाही, तर दिल्लीतील मातोश्रींचे आदेश ऐकावे लागतात' - उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्या मित्राला सोबत घेऊन प्रचार करुन, आपल्यासोबत निवडून आणले, त्याने जनादेश मिळूनही दुसऱ्यासोबत घरोबा केला. त्यामुळे आपल्याला विरोधी पक्ष म्हणून काम करावे लागतेय. भारतीय जनता पक्षाने जेवढ्या जागा लढवल्या, त्यापैकी 70 टक्के जागांवर विजय झाला. भारतीय जनता पार्टी असा विद्यार्थी आहे, ज्याला 70 टक्के मार्क आहेत, तो मेरीटमध्ये आला, वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला, पण त्याला बाहेर बसवले गेले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी केली होती. काळजीवाहू सरकारने 8 हजार प्रमाणे मदत केली, परंतु त्यांच्या सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी देता आलेली नाही. मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनाही त्यांना मदत करता आली नाही. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी दिली, परंतु सातबारा कोरा करु, मदत करु, असं सांगणाऱ्या सरकारने अटी-शर्ती लावल्याने कोट्यवधी शेतकरी या योजनेतून लाभ घेऊ शकत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. नव्या सरकारने शेतकऱ्यांशी बेईमानी केली असून राज्य सरकारची कर्जमाफी फसवी आहे. बेईमानी ही जनादेशाशी झालेली नाही, शेतकऱ्यांशीही बेईमानी केली आहे. अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.