पालघर- कांद्याचे भाव वाढल्याने जनसामान्यांच्या घरातील कांदा जवळपास हद्दपार झाला आहे. गृहिणीला रडविणारा कांदा बाजारात खरेदी करणे कठीण बनले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता महागाईने कांद्याचे खायचे केले वांदे असे म्हणण्याची वेळ आली आहे.
कांद्याने पार केली 'शंभरी' हेही वाचा - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, पालघरमधील शेतकऱ्यांची मागणी
बाजारात कांदा प्रतीकिलो 80 ते 100, 120 रूपये ने विकले जात आहेत. हलक्या व चांगल्या प्रतीचे कांदे याअगोदर प्रतीकिलो 20 ते 30 रूपये दराने विकला जायचा. त्यामुळे प्रत्येक पदार्थामध्ये वापरला जाणारा कांदा हा सर्वसामान्यांना खरेदी करणे परवडत नाही.
हेही वाचा - पालघर जिल्हा परिषद निवडणूक आरक्षणाबाबत 16 हरकती दाखल; कोकण आयुक्तांकडे 4 डिसेंबरला सुनावणी
रडवणाऱ्या या कांद्याच्या दरवाढीमुळे हॉटेलमधूनही कांदा हद्दपार होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी तर हॉटेलात कांदा मिळणार नाही, असे फलक लागले आहेत. अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे दर वाढले आहेत, असे मत विश्वनाथ कडू यांनी व्यक्त केले आहे.