पालघर- ट्रेलरने दुचाकीस जबर धडक दिल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास बोईसर - चिल्हार मार्गावर घडली. सदर अपघातातील तरुणाच्या डोक्यावरून ट्रेलर गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. विजय सुरेश वडाली (वय. 27) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक ताब्यात घेतला असून चालक फरार आहे.
ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - accident palgher news
अहमदाबाद राष्ट्रीय माहामार्ग आणि तारापूर एमआयडीसीला जोडणाऱ्या या रस्त्यावर ठिकठिकाणी अपघात घडून निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. तर काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे.

ट्रेलरची दुचाकीला जबर धडक
पालघर तालुक्यातील बोरशेती येथे राहणारा विजय आपल्या दुचाकीवरून निहे येथील मावशीकडे आपल्या आईला सोडून येत होता. रात्री दहाच्या सुमारास नागझरी नाका येथील रस्ता पार करताना बोईसर दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात विजय जागीच ठार झाला. त्याच्या पश्चात त्याला एक अडीच वर्षाचा मुलगा, एक दीड वर्षाचा आणि पत्नी असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच मनोर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
गतिरोधक बसविण्याची मागणी:-
अहमदाबाद राष्ट्रीय माहामार्ग आणि तारापूर एमआयडीसीला जोडणाऱ्या या रस्त्यावर ठिकठिकाणी अपघात घडून निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. तर काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. अपघातप्रवण ठिकाणी वाहनांच्या वेगाना आवर घालण्यासाठी गतिरोधक बसविणे गरजेचे बनले आहे. तरी अशा ठिकाणी तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी स्थानिक नागरिक तसेच प्रवासी वर्गाकडून होत आहे.