पालघर -जिल्ह्यातील बोईसरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईहून आलेल्या या 35 वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाला उपचारासाठी पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बोईसरमध्ये आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, पालघर ग्रामीणमध्ये रुग्णांचा आकडा २० वर - palghar corona news
बोईसरमधील आढळलेल्या या रुग्णाला मुंबईतच कोरोना संसर्ग झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बोईसरमध्ये आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
रुग्णाच्या अति जोखमीच्या सहवासात असलेल्या 10 जणांना विलगीकरण करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील एक व्यक्ती मुंबई येथे रुग्णालयात दाखल असून, त्यासाठी तो मुंबईत गेला होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. बोईसरमधील आढळलेल्या या रुग्णाला मुंबईतच कोरोना संसर्ग झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पालघर तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत एका रुग्णाची भर असून, आतापर्यंत पालघर तालुक्यात 12 तर डहाणू तालुक्यात 8 रुग्ण आढळले आहेत.
बोईसरमध्ये आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
Last Updated : Apr 27, 2020, 3:02 PM IST