पालघर - जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. पालघरमधील रामनगर परिसरातील रहिवासी असलेल्या एका 35 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. महिला मुंबईतील के.ई.एम रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. या महिलेची मुंबई येथे चाचणी केली असता तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
पालघरमधील आणखी एका महिलेला कोरोनाची लागण, के.ई.एम रुग्णालयात होती कार्यरत - पालघरमधील कोरोना रुग्णांची संख्या
पालघरमधील रामनगर परिसरातील रहिवासी असलेल्या एका 35 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. महिला मुंबईतील के.ई.एम रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. या महिलेची मुंबई येथे चाचणी केली असता तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

corona file image
कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या 5 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या 29 वर पोहोचली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने थैमान घातल्याने ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.