महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाडा : 'त्या' कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह - पालघर कोरोना रुग्ण

वाडा तालुक्यातील एका ५० वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

one more corona positive found in wada palghar
वाडा : 'त्या' कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह

By

Published : May 24, 2020, 9:36 PM IST

वाडा (पालघर) - तालुक्यातील एका ३२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्याच्या संपर्कातील १३ लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या १३ जणांचा अहवाल आज आला असून १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. तर एका ५० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती वाडा तालुका प्रशासनाने दिली. या पॉझिटिव्ह रुग्णासह आता वाडा तालुक्यातील रुग्णांची संख्या ५ इतकी झाली आहे.

वाडा तालुक्यात कोरोनाची लागण झालेला ३२ वर्षीय तरूण, मुंबई येथे अग्निशामक दलामध्ये नोकरीला आहे. तो घरगुती कामानिमित्त मुंबईहून गावी ये-जा करत होता. काही दिवसांपूर्वी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला. यात तो पॉझिटिव्ह आढळून आला. यामुळे तालुका प्रशासनाने, त्या व्यक्तीच्या गावातील १६५ घरे प्रतिबंधित केली आणि तीन टीमची नेमणूक करत तपासणी मोहिम सुरू केली. तसेच यावेळी त्या व्यक्तीच्या संपर्कातील १३ जणांना क्वारंटाइन करत, त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले.

आज त्या १३ जणांचे अहवाल आले आहेत. यात त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या पुरूषाची ५० वर्षीय नातेवाईक बाधीत आढळली आहे. दरम्यान, जव्हार तालुक्यातही एक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

हेही वाचा -मजुराला मारहाण प्रकरणी पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे सक्तीच्या रजेवर

हेही वाचा -नायगावमध्ये 'त्या' दाम्पत्याने गरजूंमध्ये लग्नाचा वाढदिवस केला साजरा

ABOUT THE AUTHOR

...view details