पालघरमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णाची पत्नीही कोरोना पॉझिटीव्ह - one more corona positive case in palghar
सफाळे परिसरात दुसरा कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. 46 वर्षीय महिलेचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. या महिलेवर पालघर येथील ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात बुधवारपासून उपचार सुरू आहेत.
पालघरमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णाची पत्नीही कोरोना पॉझिटीव्ह
पालघर- सफाळे परिसरात दुसरा कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. 46 वर्षीय महिलेचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. या महिलेवर पालघर येथील ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात बुधवारपासून उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे बुधवारी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या त्या पत्नी आहेत. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक आणि व्यक्ती अशा जवळपास २० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.