महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोनावे फोंडापाडा येथून अवैद्य अग्निशस्त्र बाळगणार्‍यास अटक; पालघर दहशतवाद विरोधी पथकाची कामगिरी - Palghar Anti-Terrorism Squad latest News

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत अवैद्य अग्निशस्त्र बाळगणार्‍या आरोपीस अटक केली आहे. पथकाने सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनावे फोंडापाडा येथून आरोपीला अटक केली आहे. चिमा शेड्या बरफ (वय ५६) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

जप्त केलेला अवैध शस्त्र साठा

By

Published : Oct 16, 2019, 11:42 PM IST

पालघर- विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत अवैद्य अग्निशस्त्र बाळगणार्‍या आरोपीस अटक केली आहे. पथकाने सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनावे फोंडापाडा येथून आरोपीला अटक केली आहे. चिमा शेड्या बरफ (वय ५६) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती देताना दहशतवाद विरोधी पथकाचे सह पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील

सफाळे पोलीस ठाणे हद्दीत जिल्हा दहशतवाद विरोधी पथक गस्त घालत होते. गस्ती दरम्यान पोलिसांना सोनावे फोंडापाडा येथे शेतातील एका झोपडीत सिंगल बोअर बंदुका, नवीन बंदुका तयार करण्याचे साहित्य, जिवंत काडतुसे, रिकामी झालेली काडतुसे व जिवंत काडतुसे तयार करण्याचे सामान व प्राणघातक अग्निशास्त्रे विनापरवाना बाळगत असताना एक व्यक्ती आढळला. दहशतवाद विरोधी पथकाने त्याच्याकडून ३ गावठी बंदुका, ७ नवीन बंदुका बनवण्याच्या नळ्या, २१ जिवंत काडतुसे, ८४ शिश्याचे छर्रे व गावठी बंदुका बनवण्याचे इतर साहित्य जप्त केले आहे. चिमा शेड्या बरफ (वय ५६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विनापरवाना अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी त्याच्या विरोधात सफाळे पोलीस ठाण्यात ५६ /२०१९ भा.ह.का कलम ३, ५, ६, २५ , महाराष्ट्र पोलीस सुधारणा अधिनियम २०१४ चे कलम ३७ (१)(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-विरारमध्ये अनधिकृत इमारतीचा भाग कोसळून पाच वर्षीय मुलीचा मृत्यू

प्रभारी अधिकारी सह-पोलीस निरीक्षक मानसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह.फौ. चंद्रकांत ढाणे, सुनील देशमुख, प्रकाश कदम, पोहवा. प्रशांत तोडकर, पोना, संतोष निकोळे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, सुभाष आव्हाड, पो.शि. तुषार माळी, शुभम ठाकूर, प्रवीण वाघ, तळपाडे, म.पो.शि. वैशाली कोळेकर, सीमा भोयेर या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा-पालघरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का... उमेदवाराच्या भावाचाच विरोधीपक्षात प्रवेश

ABOUT THE AUTHOR

...view details