वसई विरार(पालघर)- वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. दिवसाला सरासरी 150 ते 200 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. मंगळवारी वसई-विरारमध्ये एका दिवसात 137 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी दिवसभरात उपचारादरम्यान 03 रुग्णांचा मृत्यू झाला. 217 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वसई विरारमध्ये 137 कोरोनाबाधित वाढले; 217 जणांची कोरोनावर मात - पालघर लेटेस्ट न्यूज
वसई विरारमध्ये मंगळवारी 137 कोरोनाबाधित वाढले आहेत. दिवसभरात 217 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. महापालिका क्षेत्रात सध्या 2 हजार 826 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 10 हजार 696 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 292 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
137 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 13 हजार 814 झाली आहे. वसई-विरारमध्ये आतापर्यंत एकूण 292 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत 10 हजार 696 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 हजार 826 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, राज्यात मंगळवारी 11088 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 535601 अशी झाली आहे. दिवसभरात 10014 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण 368435 जण कोरोनामुक्त होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. राज्यात एकूण 148553 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.