महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये १५७ कोरोनाबाधित आढळले; रुग्णसंख्या १२ हजारांच्या उंबरठ्यावर - vasai virar corona cases

वसई विरारमध्ये शुक्रवारी १५७ नवे रुग्ण वाढले आहेत. पालिका क्षेत्रातील एकूण संख्या ११ हजार ९९१ वर पोहोचली आहे. ७ हजार ८९१ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत २४५ जणांचा मृत्यू झाला.

Vasai Virar Corona update
वसई विरार कोरोना अपडेट

By

Published : Aug 1, 2020, 8:37 AM IST

वसई(पालघर)- वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शुक्रवारी वसई-विरारमध्ये १५७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे येथील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

१५७ रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ११ हजार ९९१ वर पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात उपचारादरम्यान ०३ रुग्णांचा मृत्यू झाला. १३३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण २४५ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्य झाला आहे. तर आतापर्यंत ७ हजार ८९१ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ३ हजार ८५५ कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, राज्यात शुक्रवारी १०३२० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. रुग्णांची एकूण संख्या आता ४लाख २२ हजार ११८ अशी झाली आहे. ७५४३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण २ लाख ५६ हजार १५८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण १ लाख ५० हजार ६६२ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details