पालघर - शहरातील मनोर रस्त्यालगत असलेल्या गावडे चाळीतील जय अपार्टमेंट या इमारतीच्या छातावरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सरफुद्दीन शेख (वय 35), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दुपारी दोनच्या सुमारास अचानक चक्कर आल्याने ते खाली पडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सरफुद्दीन शेख हे जेवण झाल्यानंतर इमारतीच्या छतावर फिरण्यासाठी गेले होते. मात्र, तिथे त्यांना अचानक चक्कर आली. या घटनेत ते छतावरून थेट खाली जमिनीवर पडले. परिसरातील नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत तत्काळ पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी सरफुद्दीन यांना मृत घोषित केले.