पालघर - माहिम रस्त्यावर दोन दुचाकींची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला असून दुसरा जखमी झाला आहे. अमित शर्मा असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. माहिम रस्त्यावरील वळणनाका परिसरात हा अपघात झाला. अमित शर्मा हे पालघरहून माहिमच्या दिशेने निघाले होते. समोरून येणाऱ्या संजय पाटील यांच्या दुचाकीने त्यांना धडक दिली. यात शर्मा यांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या संजय पाटील यांना उपचारासाठी पालघर येथील ढवळे रुग्णालयात दाखल केले आहे.
पालघरच्या माहिम रस्त्यावर दुचाकींची धडक; एक ठार, एक जखमी - माहिम दुचाकी अपघात न्यूज
यावेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात प्रशासनाचेही दुरुस्तीकडे लक्ष नाही. त्यामुळे अनेक अपघात होऊन नागरिकांना आपला जीवही गमवावा लागत आहे.
![पालघरच्या माहिम रस्त्यावर दुचाकींची धडक; एक ठार, एक जखमी dead man](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-03:26:15:1606211775-mh-pal-bikeaccidentonedead-7204237-24112020150447-2411f-1606210487-719.jpg)
मृत व्यक्ती
दोन दिवसांपूर्वीच बोईसर-चिल्हार मार्गावरही असाच दुचाकी अपघात झाला होता. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते. बाईसर-चिल्हार रस्त्याचे काम अर्धवट असल्याने त्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत.