पालघर- शहरातील माहीम बायपास रोडवर ट्विंकल स्टार हायस्कूलनजीक दोन दुचाकींची जोरदार धडक झाली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. कौशलेश चौबे, असे अपघातातील मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
शहरातील पालघर-माहीम बायपास रोडवर ट्विंकल स्टार हायस्कूलजवळ भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत दुचाकीवर असलेले ट्विंकल स्टार हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेले कौशलेश चौबे हे रस्त्यावरच्या दुभाजकावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला जबर मार बसून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. याचबरोबर समोरच्या दुचाकीस्वारालाही गंभीर दुखापत झाली होती.
माहीम बायपासवर दोन दुचाकींची धडक; एकाचा मृत्यू; एक गंभीर - two wheeler accident news
शहरातील पालघर-माहीम बायपास रोडवर ट्विंकल स्टार हायस्कूलजवळ भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत दुचाकीवर असलेले ट्विंकल स्टार हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेले कौशलेश चौबे हे रस्त्यावरच्या दुभाजकावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला जबर मार बसून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.
माहीम बायपासवर दोन दुचाकींची धडक
अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ दोघांनाही उपचारासाठी ढवळे मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी चौबे यांना मृत घोषित केले. तर दुसऱ्या जखमी दुचाकीस्वारावर उपचार सुरू केले आहेत. हा अपघात घडला तेव्हा याच रस्त्यांनी पालघर जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक देशमुख हे जात होते. त्यांनी आपली गाडी थांबवून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यासाठी मदत केली. या घटनेची पालघर पोलिसांनी दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे.