पालघर- बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने विक्रमगड मधील मालेफाटा येथील भिवा धर्मा मेघा (वय ७० वर्षे) या वृद्ध पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी बस चालक भिवा हाडळ याला विक्रमगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एस.टी. बसच्या धडकेत वृद्ध पादचारी ठार
बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने विक्रमगड मधील मालेफाटा येथील भिवा धर्मा मेघा (वय ७० वर्षे) या वृद्ध पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अपघातग्रस्त एस.टी.बस
वाडा बस आगारातील बास्ता-वाडा या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालक नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यास धडकून बस शेतात उतरली. या अपघातात जखमी झालेल्या भिवा मेघा याला उपचारासाठी वाडा येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती विक्रमगड पोलिसांनी दिली.
मृताच्या नातेवाईकांना वाडा आगाराकडून तातडीची १० हजार रूपयांची मदत दिली असल्याची माहिती आगार प्रमुख मधुकर धांगडा यांनी माहीती दिली.