पालघर -ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, या मागणीसाठी ओबीसी संघर्ष समन्वय समितीकडून आज जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले. वाडा तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
२०२१ला जनगणना होणार असून यात ओबीसींची जात निहाय जनगणना करावी, ओबीसींच्या महाज्योती संस्थेला १० हजार कोटीची तरतूद करण्यात यावी, मराठा समाजाचे ओबीसीमध्ये समावेश नको, तसेच राज्यात १०० बिंदू नामावली लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. वाडा तहसीलदार उद्धव कदम यांना मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.