पालघर -मराठा समाजाला ओबोसी संवर्गातून आरक्षण देऊ नये. आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज (दि. 3 ऑक्टोबर) पालघरमधील तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करत ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ओबीसी समााज हा शैक्षणिक, सामाजिक व राजकीय लाभांपासून वंचित असून, ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लावू नये आणि मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना आंदोलक मराठा आरक्षणाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध नाही. मात्र, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी, ओबीसीचे वसतीगृह सुरू करण्यात यावे, महाज्योतीला अधिक निधी देण्यात यावा, ओबीसी विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती देण्यात यावी तसेच शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण मिळावे. ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरित सरकारने मान्य कराव्यात, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समाजाकडून देण्यात आला आहे.
- ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध
सध्या राज्यभरात मराठा समाजातील काही प्रमुख नेते मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसी कोट्यातून द्या, अशी मागणी करत आहेत. याला सर्व ओबीसी समाजाचा विरोध आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ओबीसी समाजाची याबाबत कोणतीही हरकत नाही. मात्र, हे आरक्षण देताना मराठा समाजाला ओबोसी संवर्गातून आरक्षण देऊ नये, अशी मागणी ओबीसी समाजाकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा -नालासोपाऱ्यात कोट्यवधींचे कोकेन जप्त ; चार नायजेरिअन नागरिकांना अटक