पालघर -जिल्ह्यातील एका पोल्ट्री व्यवसायिकाने कोंबडीच्या मांसाला उठाव नसल्याने 9 लाख उबलेली अंडी तसेच पावणे दोन लाख नवजात कोंबड्यांच्या पिल्लांना जमिनीमध्ये पुरल्याची घटना समोर होती. या घटनेबाबत पोल्ट्री व्यावसायिकाला जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून नोटीस काढून विचारणा केली असता, सदर व्यवसायिकाने मात्र प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.
कोंबड्या आणि अंडी जमीनीत गाडल्याबाबत व्यवसायिकाला पशुसंवर्धन विभागाकडून नोटीस... हेही वाचा...कोरोना इफेक्ट : पालघरमध्ये 9 लाख उबलेली अंडी, पावणे दोन लाख कोंबड्यांची पिल्ली केली नष्ट
भारतात कोरोनो विषाणूच्याबाबत भीती निर्माण झाल्यानंतर समाजमाध्यमांच्या माध्यमातून अफवांना उधाण आले. यात चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, अशी अफवा पसरल्यामुले याचा थेट परिणाम पोल्ट्री व्यवसायावर झाला. कोंबडीचे भाव बाजारात घसरले आणि पोल्ट्री व्यवसायाला घरघर लागली, याचा धसका घेऊन डहाणू तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक संदीप भाटलेकरांनी त्यांच्या पोल्टी फर्ममधील जवळपास 9 लाख उबलेली अंडी आणि पावणे दोन लाख नवजात जिवंत पिल्ले खड्डा खोदून जेसीबीच्या सहाय्याने पुरून टाकल्याची बाब समोर आली होती.
संदीप भालेटकर यांना याबाबत, जिल्हा प्रशासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून जाब विचारण्यात आला. त्याच्या प्रत्युत्तर दाखल संदीप भालेटकर यांनी ही बाब लपवण्यासाठी आम्ही असा कोणताच प्रकार केला नाही, असे उत्तर दिले आहे. तसेच अंडी नष्ट करण्यासाठी संबंधीत कंपनीकडून सांगण्यात आले होते, असे दिशाभूल करणारे उत्तर पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे भाटलेकर संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून पशुसंवर्धन विभागाकडून त्यांना कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे.