पालघर - जिल्ह्यात आजवर परदेशातून आलेल्या ९६ प्रवाशांचा जिल्हा प्रशासनामार्फत शोध घेण्यात आला. यापैकी १९ जणांचा १४ दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण झाला आहे. यापैकी ११ प्रवाशांमध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती ४ प्रवासी निगेटिव्ह असल्याचा अहवाल दोन दिवसांपूर्वीच आला होता. आज(मंगळवार) उर्वरित ७ प्रवाशांचादेखील तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात सध्यस्थितीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पालघर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या वस्तूंचे दुकाने, बियर/वाईन शॉप, सर्व देशी दारूचे दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यावेळी अन्य जीवनावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.